ई पीक पाहणी च्या रब्बी हंगामाची मुदत १५ फेब्रुवारी.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्यास्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅप द्वारे आता पर्यंत सुमारे 98 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी भ्रमणध्वनी अॅप द्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.
सध्या रब्बी हंगामाच्या पीक पाहणीची कार्याहावाही सुरु आहे.रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई-पीक पाहणी चे 1.0.0.7 हे मोबाईल अॅपचे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. तरी सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.
रबी हंगामातील पिकांची ई- पीकपाहणी नोंदवण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२२ हि आहे. तरी शेतकरी बंधुंना आवाहन येते कि सर्व शेतकरी बंधूंनी मुदतीच्या आत रबी हंगामाची आपली पिक पाहणी मोबाईल अॅप द्वारे पूर्ण करून घ्यावी.