शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे आणि सुलभ व्हावे यासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये महत्त्वाचे बदल करून या ॲपची सुधारित आवृत्ती -२ विकसित करण्यात आली आहे. हे सुधारित मोबाइल ॲप दि.१ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाइल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
ई पीक पाहणी ॲप Version – 2 नवीन महत्वाचे बदल जाणून घ्या
E Peek Pahani New Version – 2 ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0
Application
मधील नवीन सुधारणा तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना मागील हंगामाची पीक पाहणी कायम ठेवण्याची सुविधा, एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना एका पेक्षा जास्त गट क्रमांक निवडून एकाच वेळी नोंदविण्याची सुविधा.
1 . Geo Fencing. सुविधा –
सुधारित मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे (centroid) अक्षांस व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना पिकाचा फोटो घेतील त्यावेडेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू (centroid) पर्यतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. व शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाईल
अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविध्येमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
2 . ई. पीक पाहणी शेतकयांद्वारे स्वयं प्रमाणीत मानण्यात येणार –
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार असून अश्या रीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई –
पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिबीत होणार आहे.
3. किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत –
वरील प्रमाणे शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी १०% नोंदीची पळताळणी तलाठी यांचे मार्फत करण्यात येणार असून त्यामध्ये पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकिचा फोटो असलेल्या नोंदी व विहित अंतराच्या बाहेरून घेतलेले फोटो अशा नोंदीचा समावेश असणार आहे.
तलाठी
हे पळताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील. त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिबीत होतील.
• 48 तासात खातेदारास स्वतः पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा –
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी अशी पीक पाहणी नोंदविल्या पासून ४८ तासामध्ये स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.
किमान आधारभूत किंमत योजनेंअतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा –
किमान आधारभूत योजने अंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकर्यांनी नोंदणी केल्यास
पाहणी अॅपमध्येच शेतकऱ्याला “आपणास किमान आधारभूत किमान योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय?. असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्याने होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
ई-पीक पाहणी अॅपमध्येच मदत बटन देण्यात आलेले आहे –
वापरकत्याला ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरतांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये ” मदत हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणवर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत (FAQ), तसेच ई-पीक पाहणी ॲपमधील कायम पड़ क्षेत्र नोंदविणे, बांधावरची झाडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे, गावची पीक पाहणी पाहणे, इत्यादी बाबतची माहिती देणाऱ्या दृकश्राव्य क्लीप (audio video clip) च्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. याचा वापर करून
शेतकरी
ॲप वापरतांना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील.
Download App on clicking below link