महा डीबीटी कृषि यांत्रिकीकरण अंमलबजावणीसाठी 2022 वर्षीपासून शेतकरी यांच्यासाठी झालेले काही बदल
•
Tractor चलित औजारांसाठी RC Book बंधनकारक
•
कॅशलेस पद्धतीनेच औजारांची खरेदी करणे बंधनकारक, रोखीने खरेदी करता येणार नाही
•
पूर्वसंमतीपूर्वी अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट प्रमाणेच औजारांची खरेदी करणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीत अपलोड केलेल्या
कोटेशन व टेस्ट रिपोर्ट व्यतिरिक्त कंपनीची खरेदी करायची असेल तर संबंधित शेतकरी यांनी उपविभागीय कृषि अधिकारी यांची लेखी संमती घेणे आवश्यक
एका वर्षात जास्तीत जास्त ३ औजारे किंवा अनुदान रक्कम रु १ लाख पर्यंत लाभ देण्यात येईल
ज्या औजारांसाठी अनुदानाची रक्कम रु १ लाखापेक्षा जास्त आहे अशा औजारांसाठी एका वर्षात फक्त एकच औजारासाठी अनुदान देय राहील.
अनुदान देण्यात आलेल्या tractor ची किमान ६ वर्ष आणि tractor चलित औजारांची किमान ३ वर्षे विक्री करता येणार नाही अन्यथा देण्यात आलेली अनुदान रक्कम वसुलीपात्र राहील.
रु १ लाखापेक्षा जास्त अनुदान देय असलेल्या यंत्र आजारांसाठी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड झाली असल्यास कोणत्याही एकाच सदस्यास संबंधित आजारासाठी अनुदान देय राहील.